कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बातम्या
ऐका किंवा वाचा ‘कोरोनाने सारा प्राईम टाईम, डे टाईम, नाईट टाईम व्यापला आहे. तो सर्वत्र
व्यापला असताना मला भेटला. तो का आला ते ही सांगीतले आणि माणूस जर सुधारला नाही तर
पुन्हा येईन म्हणायला लागला. तो एकटाच बोलत होता. आपल्या चुकांचा पाढा वाचत होता. तो
काय म्हटला हे त्याच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवावे वाटले… तेच येथे प्रसिद्ध
करत आहे….......
--------------------------------------------------------------------------------------------
कुणकुण लागेपर्यंत…. बातमी आली
बातमी वाचेपर्यंत…. साथ झाली
कोण एक व्हायरस… कोरोना… न दिसणारा
चेंडूसारखा गोलमटोल…. अंगावर काटे…
रंग गुलाबी…. पण प्रेमाचा नव्हे….
तिरस्काराचा धनी बनलेला…
सकाळ असो…. वा संध्याकाळ…
देहात नाही पण… मनात वसलेला…
देश… धर्म… जात… पंथ… सारी बंधने
विसरलेला
एकमेवाद्वितीय…
सर्व चॅनेल्स आणि वृत्तपत्रे व्यापलेला…
उपद्व्यापी बनलेला…
कोरोना…
काल… मला भेटला…. मन मोकळं करत…
भरभरून बोलू लागला…
‘घाबरलास मला… भितोस मला…
काय केलं मी… का घाबरतोस मला…
तुलाही… माझं वागणं चूकीचे वाटतय…
मी चुकतोय… असंच तुलाही वाटतय…
ही तर… तुमच्याच कर्माची फळ… भोगताय
तुम्ही…
मला का दोष देताय… चुकलाय तर तुम्ही…
आठव…. अगदी सुरूवातीपासून…
डार्विननच सांगीतलयं ना… उत्क्रांती
कशी झाली…
आठव अगदी तिथंपासून….
पृथ्वीवर सजीव अवतरला… तोच अपघातातून…
आमच्यासारख्या…. अनंत रचना… बनल्या
पाण्यात …
त्यातीलच… एका रचनेत जीव आला…
अमिबासारखा… एकपेशीय…
तो वाढला… उत्क्रांत पावला…
पुढे पाण्यातच…
शैवाल… जलवनस्पती…
पुढे… पाण्याबाहेरही वनस्पती…
मग जलचर…
उभयचर… भूचर.. प्राणी… आणि पक्षी…
त्यातलाच एक प्राणी… तुम्ही… वानर….
वानरापासूनच… माणूस घडला…
हे सारं मी नाही… डार्विन म्हणाला…
चार पायावरचे चालणे सोडून…
तू… दोन पायावर उभा राहिलास…
वानराचा… म्हणे नर झाला…
तुझे डोक… जमिनीपासून गेले दूर
…
तिथेच तू आमच्यापासून दुरावलास…
स्वत:ला विश्वाचा स्वामी समजलास…
स्वचा… शिरकाव तुझ्यात झाला…स्वत:पुरते
पाहू लागलास…
सगळं काही ओरबडू लागलास… स्वत:साठी…
गरज नसतानाही… कारण
तुझ्या डोक्यात केवळ तूच राहिलास
मातीपासून दूर गेलेल्या डोक्यात…
स्थिरावली अनिती… मी… माझे… मीपण…
आणि डोक्यात केवळ स्वार्थ…
हरवलेस यात… तुझे प्राणीपण…
तुला… हवे होते सुख…
त्यासाठी… लागलास… गटाने राहायला
स्थिर… प्रथम झाडावर… मग गुहेत…
आणि नंतर… नदीकाठी… घरे बांधून…
या स्थिरतेन… तू आणखी स्वार्थी
झालास…
लाथाडलेस… निसर्गनियम…
आणि लादलेस… तुझे नियम…
गरजेइतकेच घ्यावे… हा विसरलास
मूलमंत्र…
आणि बनलास धनी…
काम, क्रोध, मद, मोह, मत्सरादि
षडरिपूंचा…
हवे ते ओरबडत… अखेर…
तू… मानवही न राहता दानव झालास…
ज्यांनी तुला साथ दिली…
नगरे वसवायला… शेती करायला…
जीवनदायीनी बनली…
तिच्याकडून… घेतलेस पाणी…
पिण्यासाठी… स्वच्छतेसाठी… शेतीसाठी…
आणि तुझ्या सुखासाठी…
यंत्रे बनवणाऱ्या कारखान्यासाठी…
उद्योगांसाठी…
घेणारा… म्हणून तू घेत राहिलास…
घेणाऱ्याचे हात घ्यायला… मात्र
तू विसरलास…
तूही दिलेसना… नदीला…
दिलेस प्रदूषण… शहरातील घाणपाणी…
कारखान्यांचे… रसायनमिश्रीत पाणी..
चामडी कमावून सोडलेल… कागद बनवताना
वापरलेल…
शेतातील जास्त वापरलेल्या… खतांच
अन किटकनाशकांच ओझं…
वाहणारं पावसाचं पाणी…
ही सारी… घाण मिसळून
तू… बनवले तिलाच मृत्यूदायीनी…
तूला अन्य जीवांचे तरी… मोल कोठे…
तोडलीस वने… मारलेस प्राणी…
सगळीकडे… तुझीच मनमानी..
निसर्गाचा नियम… मोडतच राहिलास…
सुखाच्या कल्पना… वाढवत राहिलास…
तू नेहमी म्हणयचास… आम्ही केली
प्रगती…
तुला कळलेच नव्हते… हीच खरी अधोगती…
पैसा हवा… सुख हवे… त्याच्याही…
व्याख्या बदलत राहिलास…
अनेक जाती नष्ट करत गेलास…
तुझ्यातील
प्राणीपण तर… कधीच गेले होते…
माणूसपणही सोडू लागलास…
धर्म, जात.. पंथाच्या भिंती उभारल्यास..
पोकळ अस्मिता निर्माण करून…
माणसातील गरीबांना विकू लागलास…
त्यांनाही तू… झुंजवू लागलास…
कोंबड्यांच्या झुंजी… बैलांच्या
शर्यती…
घोड्यांच्या अन् गाढवांच्याही
शर्यती…
या कमी होत्या म्हणून…
लढाया आणि चढायात… गुंतलास
साम्राज्य उभारलीस… दुर्बलांना
लुटत राहिलास…
लुटत राहिलास… धन… धान्य.. अन
अगदी… शीलही…
प्राण्याना नावे ठेवू लागलास…
पण ते नियम पाळतात…
हे तू विसरलास…
तू मात्र… तुझेच नियम मोडत राहिलास…
तू वागत राहिलास अनिर्बंध…
जेत्यासारखा…
मीच सर्वश्रेष्ठ करायचे होते सिद्ध…
स्वत:ला विश्वाच्या केंद्रस्थानी
मानत राहिलास…
पण हक्क घेताना… जबाबदारी विसरलास…
काही घेतले तर दिले पाहिजे… हेच
विसरलास…
इतर सजीवांचा तर होतासच…
पण… तूच तुझा वैरी बनलास
इतरांना झुकवण्यासाठी… अनेक युद्धे
केलीस…
युद्धात जिंकत नाही… म्हणून दहशतवाद
आणला…
सगळ्यामागे काय होते रे… स्वार्थ…
मीपण..
याव्यतिरिक्त….
पण… तू ते वाढवलेस…
स्वत:चे घर… यात पेटले तरी…
तूझे उघडले नाहीत डोळे… जपत राहिलास
व्रत गांधारीचे…
दृष्टी असूनही… नाही स्वीकारलास
डोळसपणा ….
तू सत्य मानलास… निसर्गाला जिंकल्याचा
भास…
अनेक जीव संपवलेस…
प्रजाती नष्ट केल्या… वनस्पती
संपवल्या…
चिमण्या… कावळेही तुझे भक्ष्य
बनवलेस…
नाही सोडले तू अगदी… खवल्या मांजर
अन घुशीलाही…
अनिर्बंध वागलास…
पाण्यापासून… दाण्यापर्यंत…
सर्वत्र… सत्ता राबवत राहिलास…
तुझी संख्या वाढवताना… इतर जीवांचे
दिलेस मोल…
तुला हक्क नसताना… निसर्गाचा नियम
मोडून…
जंगले संपवली… प्राणी संपवलेस…
पाणीही संपवलेस…
निसर्गानं… तुला अनेकदा समजावले…
कधी भूकंप… कधी अवर्षण…
कधी अतिवृष्टीच्या रूपात येवून…
पण…
यातून… तू सावरत राहिलास…
म्हणून पुन्हा पाठवले…
कधी प्लेगच्या… तर कधी मलेरियाच्या
रूपात…
कधी देवीच्या… कुष्ठरोगाच्या..
कधी एडस… तर कधी सार्स… इबोनाच्या
रूपात…
त्यावर… तू औषधे शोधलीस…
तू… पुढे जात रहिलास…
पुन्हा… निसर्गाची हानी करत…
विरोध करणाऱ्यांना… संपवत…
मग तो गॅलिलिओ असो किंवा ग्रेटा…
सत्य सांगणाऱ्याना… वेडे ठरवत…
तूला पुन्हा शिकवायला हवा होता
धडा…
म्हणूनच… मला पाठवलय…
आता मात्र तू घाबरलास….
स्वत:च्या दिसण्याचा गर्व तूला…
तोंड झाकून फिरायला लागलास…
माझ्या येण्यान…
विमान सोडलस… गाड्या बंद केल्यास…
एसी बंद… कारखाने बंद…
कोणीही आंदोलन न करता… सारे बंद…
प्रत्येकाच्या… देहात शिरला नसलो
तरी…
मनात… मी शिरलो आहे…
माझ्या भितीने… तुझे विश्व व्यापले
आहे…
विश्वाचा मालक व्हायच होत तूला…
आज… गल्लीतही भितोस फिरायला
मी गाठेन… ही एकच मनात भिती…
किती जगले किती मेले पहात जाती
राती…
माझ्या भितीन का होईना… तू सगळ
थांबवलस..
कुठं महिना तर कुठे पंधरा दिवस…
कार्बन उत्सर्जन थांबलय…
थांबलेल… निसर्गचक्र मात्र सुरू
झालय…
शंभर वर्षानंतर…
पक्षांनी सुटकेचा घेतलाय श्वास…
ओझोन पातळी लागू लागली ठिगळं…
ज्यांना जगायचय… त्यांना रान झाल
मोकळं…
जाता जाता… एक आठवला… तुझाच नियम…
तूच बनवलेला… गुन्हेगारांच तुम्ही
तोंड झाकता…
आज… तुम्ही सर्वानी तोंड झाकलय…
तुम्ही गुन्हा केलाय… तुम्हाला
तोंड दाखवायची लाज वाटते म्हणून…
माणूस गुन्हेगार आहे म्हणून…
म्हणून म्हणतोय….
आता तरी सुधार.. स्वार्थाला आवर…
पृथ्वी एकट्याची नाही… सर्वांची
आहे…
आता तरी हे सत्य स्वीकार….
निसर्ग टिकू दे…
तूझ्यामुळं बिघडणार… निसर्ग चक्र
सावर…
एक विचारू नकोस… मी कोणामुळे आलोय…
निसर्गाने दिलेला झटका….
की
तुमच्यापैकी कोणाची चूक…
जबाबदार कोणीही असलं… तरी मूळाशी
तुझा स्वार्थ आहे..
नाहीतर… डायनॉसॉर संपला तसं…
तूला संपवायच सामर्थ्य… निसर्गात
आहे…
कदाचित… तू मलाही संपवशील…
पण… मी नवे रूप घेईन आणि…
तू सुधारला नाहीस तर…
लक्षात ठेव….
मी पुन्हा येईन…
मी पुन्हा येईन…
मी पुन्हा येईन
Good message to Indian
उत्तर द्याहटवाTrue
उत्तर द्याहटवाआदरणीय शिंदे सर प्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर आणि समर्पक व ओघवत्या भाषेमध्ये आपण आजच्या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या घटकांचे वर्णन आणि विवेचन केलेले आहे मानवाने आपल्या वर्तणुकीत बदल केला तर त्याचा या पृथ्वीतलावर टिकाव लागेल हेच यातून दिसून येते
उत्तर द्याहटवाधन्यवाद
आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या!
अतिशय सुंदर माहिती, सुंदर विश्लेषण, सोपी व बोलकी भाषा
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर, खूप शुभेच्छा
लोक डोन आणि आणीबाणीच्या परिस्थितीत व्यक्त झालेली प्रतिभाशक्ती यांचा सुंदर मिलाफ अभिनंदन पण पुन्हा नको पुन्हा येणार नाही पुन्हा येणार नाही आणि येऊ देणार नाही
उत्तर द्याहटवाछान . लिहते आहात पण पाहिलं कायम तुम्हाला गद्या मध्ये
उत्तर द्याहटवाआज मात्र पद्या मध्ये .विषय तसा क्लिष्ट आहे पण आपण दीर्घ मुक्त छंदातील मांडणी केली .अप्रतिम..पुन्हा लिहा ,पुन्हा लिहा ,आम्ही नक्की वाचू ...
Great sir... You have explained evey aspect of the issue very fluently. Touchy also...
उत्तर द्याहटवाExcellent sir....
उत्तर द्याहटवानमस्कार सर
उत्तर द्याहटवालेख खुपच छान आहे आवडला आणि विचार करायला लावणारा आहे प्रत्येकाने विचार करून आपल्यात बदल करून घ्यावेत अन्यथा अशा घटनांना वारंवार सामोरे जाण्यास तयार राहावं
Great Sir
उत्तर द्याहटवानमस्कार सर..!,
उत्तर द्याहटवाज्वलंत विषय,अतिशय सुंदर माहिती, समर्पक विश्लेषण, सोप्या व बोलक्या भाषेतील संवादच..!
अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा सर
खूप छान मांडणी केलीत सर.. खरंच आता सुधारणा होईल
उत्तर द्याहटवा👌🏻👌🏻खुप सुंदर मांडणी
उत्तर द्याहटवामाझ्या स्विमिंग ग्रुप वर सर्वाना आवडला
आभारी आहे कारण सर्व सर्व शंका निरसन झाले
डॉ. व्ही. एन. शिंदे सर तुमचे अभिनंदन करावे तेव्हडे थोडेच आहे. सद्य स्थिती, परिस्थिती, निसर्गावर अन्याय करत मानवाने केलेली प्रगती, त्याच प्रगती मार्गावरून जात असतानाच होत असलेली मानवाची अनभिज्ञतेतून होणारी अधोगती, त्यातूनच कोरोनाची निर्मिती, प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली भीती, राग, रंग, लोभ, मत्सर, जात, पातीच्या पलीकडे परत एकदा जाऊन निसर्ग नियमाप्रमाणेच वागण्याची आलेली अनुभूती, व परत एकदा स्वार्थी भावना त्यागून नव्या दमाने पण निसर्ग नियमाने मानवास उत्क्रांती घडवसाठी आलेली उत्पत्ती, अतिशय सुंदर पणे लेखात व्यक्त झाली आहे.
उत्तर द्याहटवामी पुन्हा अभिनंदन करतो, मी पुन्हा अभिनंदन करतो.
अतिशय उत्तम सादरीकरण.आपल्या कल्पनाशक्तीस मनापासून अभिवादन. मानवजातीला सुचना वजा सावधानतेचा आणि निसर्गाच्या दहशतीचा कोरोनाच्या माध्यमातून लेखनशैलीस शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाफारच छान.. सुंदर मांडणी... विचार करायला लावणारा...अभिनंदन सर
उत्तर द्याहटवाडॉ तानाजीराव दबडे
डायरेक्टर
Very nice
उत्तर द्याहटवाDr. C. H. Bhosale
उत्तर द्याहटवातुमच्यावर सरस्वती प्रसन्न आहे हे तूम्ही अनेक वेळेस सिद्ध केलेआहे. आज मांडलेला विचार मानवाच्या जीवन मरणाचा आहे. असे लिखाण आवश्यक आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
Sir you have illustrated it in scientific manner. I may call it prosaic poem. It shows how depthly you ponder over the issues. People may seriously think hereafter, at least we can hope so. Take care.
उत्तर द्याहटवाEye opening article.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर मांडणी....अभिनंदन! सर
उत्तर द्याहटवाDear Sir, exceptionally good.
उत्तर द्याहटवाDear sir,
उत्तर द्याहटवाExcellent article in poetic style. It appeals to head n hear at the same time.
खूप छान सर.... अगदी आता तरी होईल..विचार..?.की काय नवीन परिस्तिथी निर्माण होईल देव जाणे...पण यातून लवकर बाहेर यावं. ..Ashwini...G.
उत्तर द्याहटवाखुपच छान सर माणुस माणुस राहीलेला नाही ताे निसर्गावर मात करु पाहात आहे त्याच्यात बदल झाला तर ताे सावरला अन्यता या ना त्या कारणाने निसर्ग तयारच आहे. सर आपले मनापासुन अभिनंदन, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेत असालच तरीपण घरी राहा सुरक्षित राहा.
उत्तर द्याहटवाछान लेख
उत्तर द्याहटवाखूपच छान सर
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवातुम्ही मांडला विकास
अ विचारांनी कसा बनला भकास
पण,काहीही म्हणा सर
तो आहे वर
म्हणून नाही डर
फक्त म्हणतो अधून मधून विचार कर
विचार कर
म्हणून म्हणतो लिहा सर
लिहा सर
कळला,
मला लेखाचा सारंश
नाही जात, नाही धर्म जबाबदार कोणता वंश
हा तर निसर्गाचा हलकासा दंश
मीडिया वर लिहितात बोलतात कसंबसं
सर्वसामान्यांना समजल कसं
म्हणतो
आहे विलास आहे विलास
कशाला अविचारी विकास अविचारी विकास
तुम्ही मांडला हिशेब झकास झकास
नको मंगळ, नको चंगळ
नको मंगळाची चंगळ
विचाराची करू दंगल
तरच घडणार नाही अमंगल
चालवा तुमची लेखणी
ती आहे देखणी
देईल डागनी
अविचारांना,अविचारांना
मंथन चिंतनाची ती आहे सोबती
विचार - अविचार ची गाथा सांगती
अविचारी विकास कसा भकास
हिशेब मांडला तुम्ही झकास झकास.....
सर , कोरोनाच्या वास्तवतेची आपण केलेली मांडणी खूप खूप आहे ,यापुढे मानवाने विचार करूनच पाऊल टाकले पाहिजे हे नक्की...सर तुमचे धन्यवाद, या माध्यमातून आपण थोड्या वेगळ्या शैलीने आपले विचार मांडून समाज प्रभोधन करता. लिहीत रहा.. हार्दिक शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाखूपच छान मांडणी. आपले अभिनंदन. आपला: डॉ. प्रवीणकुमार दि.पाटील
उत्तर द्याहटवाभाऊजी लेख खूपच छान आहे.मांडणी सूंदर आहे.Congratulations 🌷🌷🌷🌹🌹🌹
उत्तर द्याहटवाVery nice.... really true ....
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवाआपला लेख आवडला सहजपणे मांडणी करीत असताना भविष्यातही निसर्गाशी अशीच छेडछाड चालू ठेवल्यास किती भिषण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे हे नजरेसमोर आले.ग
सर,आपला लेख खुप भावला.
उत्तर द्याहटवाविलास चौथाई
बरोबर सर प्रथवी स्वतःला वाचवण्यासाठी असी रूपे घेताच राहणार
उत्तर द्याहटवासर
उत्तर द्याहटवाअप्रतिम ! खूप सुंदर !
याचा व्हिडीओ बनवावा असे वाटते
ज्या निसर्गाने माणसाला जन्माला घातले तोच जर प्रगतीच्या नावाखाली या जन्मदात्या निसर्गाचा,पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघाला तर निसर्ग त्याला माफ करत नाही.शेवटी निसर्ग हाच सर्वशक्तिमान आणि मानवी जीवन वैभवसंपन्न करणारा आहे. त्यामुळे त्याचा आदर करतच माणसानं आपली प्रगती आणि ऐहिक विकास साधला पाहिजे; अन्यथा समकालीन कोरोनाग्रस्त भयावह वास्तवाला आपल्यास वारंवार सामोरं जावं लागेल. हा इशारा या मुक्तछंदातून डिंक आहे.
उत्तर द्याहटवा-डॉ.दत्ता पाटील
अप्रतिम
उत्तर द्याहटवासर अगदी सुरेख
उत्तर द्याहटवाकोरोना यथावकाश जाईलच, आपण त्याला पळवून लावू
मात्र हा कोरोना संपूर्ण जगाला एक धडा शिकवून जाईल. त्यातून आता तरी आपण थोडं शहाणपण घेतलं पाहिजे. अन्यथा कोणत्या ना कोणत्या रुपात कोरोना नक्कीच पुन्हा येईल.
Excellent compiling of the article..appreciate the thought process
उत्तर द्याहटवानिसर्गाच्या सामर्थ्यापुढे कोणीही मोठा नाही हे वेळोवेळी त्याने दाखवून दिले आहे. मनुष्य आपल्या बुद्धिकौशल्याच्या आधारावर जगावर अधिराज्य गाजवत आहे .पण कोरोनासारख्या विषाणूने निसर्गरूपी शस्त्रच मनुष्याच्या अस्तित्वाला आव्हान देत आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
उत्तर द्याहटवाभविष्यात होणाऱ्या घटनांची नांदी सर आपल्या दृष्ट्या लिखानातून व्यक्त झाली आहे जी वास्तवदर्शी आहे. यातून वेळीच बोध घेऊन निसर्गाशी समतोल साधला तरच ही जीवसृष्टी टिकेल याबाबत शंका नाही. याबाबतचा संदेश आपल्या लिखाणातून दिल्याबद्दल धन्यवाद सर...
सर, हे लेखन ललित लेखनाच्या अंगाने जाते. तुम्ही विज्ञान लेखक म्हणून जेवढे लोकप्रिय आहात तेवढेच ललित लेखक म्हणून होणार यात शंका नाही. आपण विषय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. काव्यमय आणि ओघवती भाषा पकड ढिली पडू देत नाही. हे खूप वास्तवदर्शी लिहिला आहात. शुभेच्छा सर!
उत्तर द्याहटवाSuperb sir
उत्तर द्याहटवासर , किती सुंदर लिहिलं आहे ,भयानक वास्तव,अप्रतिम संवाद शैलीत मांडले आहे आपण. मनापासून आवडले ..
उत्तर द्याहटवाKhup chan - vijay patil sangli
उत्तर द्याहटवा