सोमवार, १७ जुलै, २०१७

सच्ची ‘ऐश्वर्य’संपन्नता




               गुरूपौर्णिमा, शिक्षक दिन या दिवशी शिक्षण क्षेत्राशी संबंधित काही ना काही उपक्रम होत असतात. या वर्षी रविवारी, ९ जुलैला गुरूपौर्णिमा होती. आजरा तालुक्यातील उत्तूर हे शैक्षणिक क्षेत्रातील लौकिप्राप्त गाव. या गावात 'त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था' गेल्या १७ वर्षांपासून कार्य करते. संस्थेचे मूळ उद्दिष्ट साहित्य, संगीत आणि कलेचा प्रसार करणे हे आहे. संस्थेने यंदाच्या गुरूपौर्णिमेला शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या चार शिक्षकांचा सत्कार झाला. पद्मभुषण जे.पी.नाईक यांच्या नावे पुरस्कार देऊन माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचा सत्कार झाला. दादा नाईक पुरस्काराने राज्य पातळीवरील आदर्श शिक्षकाचा आणि  पू. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या नावे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संस्था मागील सतरा वर्षे असे पुरस्कार देते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
       राज्यस्तरीय दादा नाईक पुरस्कारप्राप्त भाऊसाहेब शिंदे यांनी 'जॉमेट्री ट‌्युटर' हे भूमिती समजून घेण्यासाठीचे उपयुक्त उपकरण तयार केले. त्याचे त्यांनी पेटंटही घेतले आहे. या कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जे. पी. नाईक पुरस्कारासाठी अशोक देसाई यांची प्राथमिक आणि अनुजा बेळगुद्री यांची माध्यमिक शिक्षकांमधून निवड करण्यात आली होती. अनेकांचे दारूच्या व्यसनापायी मोडणारे संसार वाचवणाऱ्या, अनेक विरोधांना झुगारून दारूबंदी चळवळ नेटाने चालवणाऱ्या पी.डी. पाटील सरांना बाबा आमटे आणि साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींच्या निवडी या केवळ त्या व्यक्तीच्या कार्यावर झाल्या आहेत. संस्था अर्ज मागवत नाही अथवा नामनिर्देशन करायलाही सांगत नाही. या गुणीजनांचे समाजात दिसणारे प्रतिबिंब खरे आहे का? याची खातरजमा संस्थेचे पदाधिकारी करतात. नंतर एकत्र बैठक घेतात आणि पुरस्कार जाहीर होतात. या शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व असाधारण आहे. आजही गुरूचे गुरूपण जपणाऱ्या या शिक्षकांना आदराने सलाम करणाऱ्या संस्थेचे मोठेपणही यातून दिसून आले. या समारंभात काही गुणी मुलींचाही सत्कार झाला.
      गुरूला गुरू म्हणून मोठेपण मिळते, ते शिष्याच्या कर्तृत्वावर. गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिष्य मोठा झाला की गुरूची महती आपोआप वाढते. हे जाणणाऱ्या गुरूवर्य श्रीकांत नाईक सरांनी आणि त्यांच्या त्रिवेणी संस्थेच्या संवेदनशील मनाच्या अन्य सदस्यांनी, असाधारण यश संपादन करणाऱ्या सहा विद्यार्थिनींना बोलावले होते. यातील दोन मुलींनी दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला होता. दोघींनी राज्य पातळीवर शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले होते. या संपूर्ण समारंभातला माझ्या मनाला भावलेला सत्कार होता तो ऐश्वर्या सुतार हिचा.
दहावीच्या परीक्षेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या मुलींमध्ये ऐश्वर्या वेगळी होती. तिची निवड राष्ट्रीय पातळीवर तिने प्राप्त केलेल्या यशासाठी होती. दर वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर राष्ट्रीय पातळीवर विविध वयोगटासाठी लखनौ येथील संस्था निबंध स्पर्धा आयोजित करते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतरत्न बनलेल्या बाबासाहेबांच्या आयुष्यावर असणारी ही भव्य स्पर्धा दरवर्षी आयाजित केली जाते. देशभरातून अनेक लोक या स्पर्धेत भाग घेतात. शक्यतो या स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते केला जातो. या स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविणारी ऐश्वर्या सुतार ही कोल्हापूरची विद्यार्थिनी.
      ऐश्वर्याच‌्या वडीलाना ब्रेन ट्युमर झाला. त्यातचं ते वारले. त्यावेळी ती दुसरीत होती. वडिलांच्या उपचारासाठी वेळोवेळी तिच्या आईने कर्ज घेतले. ऐश्वर्याला लहानपणापासून वाचनाची आवड. दैनंदि वृत्तपत्र वाचायची तिला सवय लागलेली. मात्र घरच्या आर्थिक टंचाईमुळे घरात वृत्तपत्र घेणे बंद झाले. मुलीचा पेपर वाचनात वेळ वाया जा नये, असे आईला वाटायचे. मात्र आईला कळू न देता ऐश्वर्या गुपचूप शेजारी जाऊन वर्तमानपत्र वाचायची. असेच एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना ऐश्वर्याची नजर एका जाहिरातीवर गेली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या लखनौ येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा जाहीर केली होती. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास रू.50,000/- चे पारितोषिक होते. स्पर्धेसाठी राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाबाबत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असा विषय होता.
      वडिलांच्या आजारणासाठी घेतलेले कर्ज फेडताना आणि दोघींचे कसेबसे भागवताना आईचे होणारे हाल ऐश्वर्या पाहात होती. आपण हे बक्षीस मिळवले तर आईच्या कष्टात आपली बक्षीसाची रक्कम खारीचा वाटा बनेल, हे तिने ओळखले. पारितोषिक मिळविण्यासाठी कष्ट घ्यायचे तिने ठरविले. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा असल्याने कष्टही तसेच घ्यावे लागणार होते. हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच निबंध पाठवायचा होता. स्वत:साठी नाही तर आईला मदत व्हावी, या हेतूने हे पारितोषिक मिळवण्याचा ऐश्वर्याने निर्धार केला आणि ती कामाला लागली.
      शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नावावर एकच पुस्तक मिळते. ऐश्वर्याने स्वतःसह सात मैत्रिणींच्या नावावर प्रत्येकी एक या प्रमाणे आठ पुस्तके मिळविली. पुस्तकांचे बारकाईने अध्ययन केले आणि त्यानंतर प्रथम 24 पानांचा मराठीतून निबंध तयार केला. या निबंधाचे नंतर हिंदीत भाषांतर केले आणि 'राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाबाबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार' या विषयावरील आपले लेखन प्रतिष्ठानला विहित मुदतीत सादर केले.
      या निबंधाच्या परीक्षणासाठी परीक्षकांची निवड ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. ते या विषयातील आणि भाषेतील तज्ज्ञ असतात. त्यांच्यामार्फत या निबंधांची काटेकोर तपासणी केली जाते. निबंधातील मुद्द्यांना 50 गुण, मुद्द्यांच्या आकलनासाठी 20 गुण, विषयाची मांडणी, लेखन कौशल्य व सजावट  याला प्रत्येकी 10 गुण असे एकूण 100 गु होते. अशा कठोर परीक्षणासाठी ऐश्वर्याचा निबंध गेला. परीक्षण झाले आणि प्रथम ऐश्वर्याच्या शाळेत म्हणजेच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये दूरध्वनी आला. एवढा मोठा निबंध आणि एवढे प्रगल्भ विचार मांडणारी मुलगी खरंच नववीत शिकते का? याची खातरजमा करून घेतली जात होती, तीही पुन्हा-पुन्हा. शेवटी शाळेने विद्यालयाच्या संकेतस्थळावर माहिती तपासायला सांगितले. ती माहिती पाहून प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले.
      सर्वसाधारणपणे पंतप्रधान उपलब्ध असतील तर हा पारितोषिक वितरण कार्यक्रम होतो. अन्यथा बक्षीसाची रक्कम बँक खात्याची माहिती घेऊन खात्यावर जमा केली जाते. ऐश्वर्याने घेतलेल्या प्रामाणिक कष्टाचे चीज झाले. या वर्षी या कार्यक्रमाला पंतप्रधान उपलब्ध होते. त्यानुसार पुरस्कार विजेत्यांना कळविण्यासाठी प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी घरी फोन केला. ऐश्वर्या त्यावेळी मावशीकडे गेली होती. ऐश्वर्याच्या आईने फोन उचलला आणि ज्या मातेला आर्थिक सहाय्य व्हावे या उद्देशाने ऐश्वर्याने एवढे कष्ट घेतले होते, स्पर्धेत उतरली होती, त्या तिच्या आईला ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्याची ही बातमी समजली. कोण आनंद झाला त्या मातेला! त्याच आनंदाच्या भरात तिने अनवाणी पायाने बहिणीच्या घराकडे ऐश्वर्याला हाका मारतच धाव घेतली.
ईच्या त्या हाका ऐकून काही अनिष्ट घडले की काय, अशी शंका ऐश्वर्याला आली. मात्र आईच्या धावत येण्याचे कारण समजले तेव्हा त्या मायलेकीच्या डोळ‌्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. मातेच्या प्रयत्नाला हातभार लावण्याच्या उद्देशाने घेतलेले कष्ट सार्थकी लागले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या यशानंतर कोल्हापूर परिसरातील काही संस्थांनी तिचे कौतुक केले. श्रीकांत नाईक सर आणि उत्तूरच्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही या मुलीचे कौतुक करावेसे वाटले आणि गुरूपौर्णिमेला ऐश्वर्याचा सत्कार उत्तूर येथे झाला.
      या कार्यक्रमात ऐश्वर्याने आपले मनोगत व्यक्त केले. तिच्या बोलण्यातून मला तिची कहाणी थोडीफार समजली. मात्र जे काही समजले ते अस्वस्थ करून गेले,मनाला स्पर्शून गेले.    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकले. अनंत संकटांचा सामना करत ते भारतीय घटनेचे शिल्पकार बनले. ऐश्वर्यानेही स्पर्धेत उतरताना आपल्या कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीची दाहकता कमी करण्याचा हेतू ठेवला. त्यासाठी अपार कष्ट घेतले. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोल्हापूरच्या लेकीने राष्ट्रीय पातळीवरील यश संपाद केले. बाबासाहेबांच्या कष्टाचा याखेरीज दुसरा अन्वयार्थ तरी काय?

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

सोशल मिडियाचा लँड'मार्क’




^पहिली बेटी] सोन्याची पेटी शी फक्त म्हणायलाच ^म्हण आहे. आजही भारतात अनेक लोक मुलगी जन्मली की गंभीर होतात, पैसे साठवून ठेवायचा विचार सुरू करतात. पोटाला पोरगी आहे, पैसा साठवला पाहिजे, असे बोलूनही दाखवतात. मात्र डिसेंबर २०१५ ला याच्या उलटेच ऐकायला मिळाले. एका अवलियाने स्वतःला मुलगी झाली म्हणून आपल्या कंपनीचे ९९ टक्के समभाग दान करून टाकले. या समभागाची रक्कम ४५ अब्ज डाॅलर्स इतकी आहे. मुलीचं नावही ^मॅक्झिमा ठेवलं. मॅक्झिमाचा माहित असणारा अर्थ म्हणजे जास्तीत जास्त! मुलगी झाली म्हणून असे जास्तीत जास्त दान देणारा अवलिया म्हणजे फेसबुक या सोल नेटवर्किंग साईटचा निर्माता मार्क झुकेरबर्ग!
मार्कचा जन्म १४ मे १९८४ रोजी न्यूयाॅर्क हराच्या व्हाईट प्लेन्स या उपनगरात झाला. मार्कचे वडील एडवर्ड झुकेरबर्ग दातांचे डाॅक्टर आहेत. त्यांची आई केरेन मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्यांना रँडी, डोना आणि अेरियल या तीन बहिणी आहेत. नंतर ते डाॅब्ज फेरी या भागात राहू लागले. तेथेच ही भावंडे वाढू लागली. वडील घराशेजारीच दवाखाना थाटून प्रॅक्टीस करत. व्यवसायाच्या निमित्ताने झुकेरबर्ग दांपत्य संगणकाचा वापर करत असे. मार्कला संगणक लहानपणापासूनच पाहायला आणि हाताळायला मिळाला. अगदी १०र्षांचा असताना मार्कला वडिलांकडून बेसिक या संगणक भाषेचे ज्ञान मिळाले. संगणक वापरणाऱ्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे संगणकप्रणाली विकसित करणारे आणि दुसरे म्हणजे संगणक प्रणाली वापरणारे! मार्कची वाटचाल बालपणापासून संगणक प्रणाली विकासक बनण्याच्या दिशेने सुरू झाली.
मार्कचे शालेय शिक्षण सुरू होते. मुलाची संगणकाची आवड पाहून वडिलांनी डेव्हिड न्यूमन यांना घरीच संगणक शिक्षण देण्यासाठी नेमले. मात्र या अलौकिक बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला आपल्याकडे देण्यासारखे काहीच नाही, तो आपल्या फार पुढे आहे, हे लवकरच त्यांच्या लक्षात आले आणि जाहीरपणे ते तसे सांगत. दहा वर्षांच्या मार्कच्या हाती क्वाॅंटेक्स-४८६ डीएक्स संगणक आला आणि नवा खेळ सुरू झाला.
मार्कने वयाच्या बाराव्या वर्षी पहिले जाळे (लॅन) निर्माण केले, घरातल्या घरात! वडिलांच्या दवाखान्यातील आणि घरातील सर्व संगणक एकमेकांना जोडणारा प्रोग्राम मार्क यांनी लिहिला. त्याच्या सहाय्याने एडवर्ड यांना त्यांची रिसेप्निस्ट पेशंटची माहिती दे लागली. मार्कने पहिल्या संगणक जाळयाचे- नेटवर्कचे नाव ^झुकनेट असे ठेवले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच मार्क यांनी ^सिनाप्सी मीडिया प्लेअर संगणक प्रणाली विकसित केली. मायक्रोसाॅफ्ट आणि अेओएल कंपन्यांनी सिनाप्सी मीडिया प्लेअर विकत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मार्क यांनी नम्र नकार दिला. सिनाप्सी मीडिया प्लेअर प्रणाली वापरकर्त्यांच्या सवयी समजून गाण्यांची निवड करत असे. तसेच आवडणाऱ्या गाण्यांची यादी करत असे. स्लॅडाॅटवर सिनाप्सी मीडिया प्लेअर ठेवण्यात आले होते आणि पीसी मॅगेझीनने सिनाप्सीला पाचपैकी तीन गुणांकन दिले.
मार्क शाळेतही चांगले य संपादन करत होता. विज्ञान आणि भाषा वियांत विशेष प्राविण्य दाखवले. दांडपट्टा हा मार्कचा आवडता खेळ होता. शाळेच्या दांडपट्टा संघाचे ते कप्तान होते. हे सर्व सांभाळ मार्कचे संगणकासोबत काम सुरूच होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. मित्राकडून ऐकलेल्या गोष्टींच्या आधारे ते संगणकावरील खेळ तयार करत. त्यांना नवनवीन संगणक प्रणाली लिहिण्याचे जणू वेडच लागले होते.
फिलीप इक्झेटर स्कूलमधून शिक्षण संपवून सन २००२ मध्ये मार्क यांनी हर्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवे घेतला. विद्यापीठामध्ये त्यांनी मानसशास्त्र आणि संगणकशास्त्र हे विय निवडले होते. विद्यापीठ परिसरात मार्क लवकरच साॅफ्टवेअर तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ^कोर्समॅच नावाची प्रणाली विकसित केली. या साॅफ्टवेअरच्या मदतीने अन्य विद्यार्थ्यांनी कोणते विय घेतले आहेत, ते तपासून आपण कोणता विय निवडावा, याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत असे. तसेच, आपल्या चांगल्या अभ्यासासाठी कोणत्या विद्यार्थ्यांसह गट बनवावा, हे समजत असे.
त्यानंतर थोडयाच दिवसांत मार्क यांना निद्रानाशाचा त्रास सुरू झाला. त्यांना रात्री झोप येत नसे. त्यांच्या डोक्यात ^फेसमॅ या संकल्पनेने आकार घेतला आणि त्या नावाचे साॅफ्टवेअर तयार करण्याच्या मागे ते लागले. त्यांनी हाॅर्वर्ड विद्यापीठाच्या माहिती केंद्रातील विद्यार्थ्यांची माहिती हॅक केली. या माहितीतून विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली छायाचित्रे घेतली. त्यातून प्रोग्रामच्या सहाय्याने दोन मुलींच्या छायाचित्रांची निवड केली आणि त्यातून कोणती मुलगी आकर्षक आहे (हू इज हाॅटर) याचे मत नोंदविण्याचा पर्याय दिला. हाॅर्वर्ड विद्यापीठातील बहुतां मुलांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या गोष्टीनेच सारा घोळ झाला. या ठिकाणाला भेट देणाऱ्यांची संख्या एवढी वाढली की, त्या गर्दीमुळे हाॅर्वर्ड विद्यापीठाचा सर्व्हर क्रॅ झाला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली की, छायाचित्रे परवानगी न घेता वापरली आहेत.
मार्क यांना विद्यापीठाच्या चाैशी समितीला सामोरे जावे लागले. विनापरवाना छायाचित्रे वापरल्याबद्दल मार्क यांनी तत्काळ माफी मागितली. मार्क यांच्या या कृत्याबद्दल कौतुुक दूरच, पण त्यांना शिस्तभंगात्मक कारवाईला मात्र सामोरे जावे लागले. तथापि, या प्रयोगामुळे अशा प्रकारचे साॅॅफ्टवेअर समाजात वादळ निर्माण करू कते, हे मार्क यांच्या लक्षात आले.
या घटनेअगोदर सहा महिने, दिव्या नरेंद्र नावाच्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने सोल नेटवर्कची संकल्पना मांडली होती. नरेंद्रला केवळ हाॅर्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संगणक प्रणालीद्वारे जाळे निर्माण करावयाचे होते. दूरवरून आलेले विद्यार्थी अनेकदा भावनिक होतात आणि त्यांना आधार देण्यासाठी हे नेटवर्क तयार करावे, असे नरेंद्र याचे मत होते. ^कनेक्टयू नावाने हा प्रकल्प करायचा त्यांचा मानस होता. यामध्ये विंक्लेवास बंधूंचा समावे होता. विंक्लेवास बंधूंच्या वडिलांनी अर्थसहाय्य देण्याचे मान्य केल्याने खर्चाचा प्रश्न मिटला. याचा प्रोग्राम लिहिण्याचे आणि सोर्स कोड निर्मितीचे काम मार्क यांच्यावर सोपविण्यात आले. मार्क यांनी हे काम करण्याचे मान्यही केले. मात्र हे काम करता करता मार्क यांना स्वतःची नवी सोल नेटवर्किंग साईट सुरू करण्याची कल्पना सुचली.
आपल्याकडे पुस्तक किंवा नोंदवही ठेवली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, संपर्क साधन आणि छायाचित्र लावलेले असते. विद्यार्थी वसतिगृहे, महाविद्यालये किंवा विद्यापीठ अधिविभाग अशी छायाचित्रयुक्त पुस्तके जतन करतात, म्हणून ते फेस-बुक! त्यावरून त्यांना नावाची संकल्पना मिळाली. दिनांक फेब्रुवारी २००४ रोजी मार्क यांनी स्वतःची साईट ^दि फेसबुक सुरू केली. आज ही साईट फेसबुक डाॅट काॅम म्हणून सर्वपरिचित आहे. सुरूवातीला ही साईट फक्त हाॅर्वर्ड निवासियांना उपलब्ध होती. मार्क आणि त्यांच्या साथीदारांच्या असे लक्षात आले की, या साईटवर मुळातच चार हजार जणांनी नोंदणी केली आहे. या फेसबुकचा विस्तार करण्यासाठी आणखी काही प्रोग्रामरची गरज भासणार होती. त्यांनी शेजारील खोलीतील डॅरेन माॅस्कोविझ यांची मदत घ्यायचे ठरविले. डॅरेन यांनी फेसबुक कोलंबिया स्टॅनफोर्ड आणि येल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. या काळात मार्क यांनी फेसबुकचे ५०३.६ कोटी शेअर्स स्वतःच्या नावावर घेतले. कंपनीचे समभाग मार्क यांचेकडे ६० टक्के, एडूअर्डो सॅवरीनकडे ३५ टक्के आणि डॅरेनकडे टक्के असे विभागले.
लवकरच ज्या विद्यार्थ्यांचा इ-मेल शिक्षणक्षेत्रातील असेल (एज्यू डोमेन) त्यांना फेसबुक उपलब्ध करून देण्यात आले. केवळ शिक्षण क्षेत्रातील लोकांना फेसबुक उपलब्ध झाल्याने दर्जेदार सुशिक्षित वर्ग जोडला जा लागला. फेसबुकला नोंदणी करताना स्वतःची पूर्ण माहिती भरावी लागत असे. तसेच, अद्यावत छायाचित्र अपलोड करावे लागत असे. त्यानंतर काही दिवसांतच फेसबुकने हॉर्वर्ड विद्यापीठाच्या सीमा ओलांडल्या आणि ते सर्व शिक्षण क्षेत्रातील लोकांना उपलब्ध झाले. फेसबुकला अमाप लोकप्रियता लाभली. आता मार्क यांना गुंतवणूकदार मिळावेत, असे वाटू लागले. त्यांना पिटर थील नावाचे सिलीकाॅन व्हॅलीतील मोठ्या उद्योगपतीकडून ५ लाख डाॅलर गुंतवणूक करण्याचे आश्वासन मिळाले. आणखी झपाट्याने फेसबुकचा विस्तार हो लागला. फेसबुकवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या एका वर्षातच एक कोटीच्या पुढे गेली. आणखी गुंतवणुकीची गरज निर्माण झाली. अॅसेल आणि ग्रेलाॅक यांनी अनुक्रमे १२.७ आणि २७.५ कोटी डाॅलरची गुंतवणूक केली.
सन २००५ मध्ये फेसबुक जगातील कोणत्याही विद्यापीठातील व्यक्तीला नोंदणीसाठी उपलब्ध करून दिले. मार्कना त्यावेळीही आपली ही नेटवर्कींग साईट केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे, असे वाटत होते. मात्र फेसबुकचा वापर झपाट्याने वाढत होता. अखेर फेसबुक शिक्षणक्षेत्राशी संबंधित नसलेल्या लोकांसाठीही खुले करण्यात आले.
फेसबुकमध्ये आपण कधी काळी भेटलेल्या मित्राला नलाईन संदे दे कतो, हा सर्वात मोठा आकर्षणाचा भाग होता. फेसबुक वापरकर्त्याकडून कोणतेही शुल्क घेत नसताना हा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता. सदस्य संख्या कोटी-कोटी उड्डाणे घेत होती. सदस्यांची सर्व माहिती भरलेली असे. त्यातून फेसबुक सदस्यांची गरज ओळखली जा कत होती. त्यानुसार सदस्यांच्या फेसबुक पेजवर त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची, सुविधांची जाहिरात करता येणे शक्य होते. सदस्याला आवश्यक माहिती मिळाल्यास तक्रारीला वाव नव्हता. फेसबुकचे ५० कोटी सदस्य झाले होते. तेव्हा विविध कंपन्यांनी फेसबुक विकत घेण्याची तयारी सुरू केली. याहूने तर ९०० कोटी डाॅलर्सची फर दिली. पण मार्क मात्र अजूनही असमाधानी होता. फेसबुकने आता जाहिराती देणे मात्र सुरू केले.
एकीकडे फेसबुकची सदस्य संख्या वाढत होती, तर दुसरीकडे न्यायालयीन प्रकरणे सुरू झाली. फेसबुक सुरू होताच आठ-दहा दिवसांतच पहिले प्रकरण दाखल झाले. सर्वप्रथम नरेंद्रने आपली कल्पना चोरल्याचा आरोप केला. त्याला कॅमरन आणि टायलर यांनी साथ दिली.  सन २००३ मध्ये आपण हाॅर्वर्ड कनेक्शन डाॅट काॅॅम साठी झुकेरबर्गला काम दिल्याचा आरोप केला. तीच कल्पना वापरून त्याने फेसबुक तयार केल्याचे त्यांचे म्हणणे होते. न्यायालयीन प्रकरणासोबत या मंडळींनी वृत्तपत्रातूनही आरोप केले. नरेंद्र आणि साथीदारांनी त्याच वर्षी ^कनेक्टयू सुरू केले होते. वृत्तपत्रांना मार्क यांनी वस्तुस्थिती सांगूनही फेसबुक विरोधात बातम्या ये लागल्या. नरेंद्र आणि त्यांच्या साथीदारांचे प्रकरण न्यायालयाने फेटाळले. मात्र नरेंद्र आणि विंक्लेवास बंधूंनी पुन्हा नवीन न्यायालयीन दावा दाखल केला. न्यायालयाने आरोपाची हानिशा करण्यापूर्वीच सन २००९ मध्ये मार्क यांनी समझोता केला. नरेंद्र आणि अन्य याचिकाकर्त्यांना २० कोटी डाॅलर रोख आणि २५ कोटी डाॅलरचे फेसबुकचे समभाग देन प्रकरण मिटवले. कनेक्टयूची सदस्य संख्या एक लाखापेक्षा कमी होती तर, फेसबुकने १५० कोटींचा आकडा ओलांडला होता.
न्यायालयीन प्रकरणात तडजोड करूनही विंक्लेवास बंधू काही शांत होत नव्हते. त्यांनी पुन्हा न्यायालयात दावा दाखल केला. मात्र आता न्यायालयाने तो स्वीकारण्यास नकार दिला. तरीही पुन्हा मे २०११ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला. मात्र तोही अयस्वी झाला आणि फेसबुक आता मोकळेपणाने प्रगती करू लागले. या कालावधीतही फेसबुक विकत घे इच्छिणारेही वाढत होते.
सन २००७ मध्ये मायक्रोसाॅफ्टने फेसबुकचे २४० कोटी डाॅलर्सचे समभाग खरेदी केले. त्यामुळे फेसबुकचे एकूण मूल्य १५ अब्ज डाॅलर असल्याचे मानले जा लागले. बिल गेटस् यांनी स्वतःही फेसबुकवर नोंदणी केली. मात्र त्यांच्याशी संवाद साधू इच्छिणाऱ्यांनी इतकी गर्दी केली की, शेवटी त्यांनी ते काही काळ बंद ठेवले. त्यांना फेसबुकच्या ताकतीचा पूर्ण अंदाज होता. मायक्रोसाॅफ्टने फेसबुकवर आपली जाहिरातही अनेक वर्षे प्रसिद्ध केली. आता फेसबुकचे मूल्य २०० अब्ज डाॅलर झाले होते. २०१३ मध्ये फेसबुकची वार्षिक उलाढाल ७.८७ अब्ज डाॅलर आणि निव्वळ नफा दीड अब्ज डाॅलर होता. हा सर्व नफा निव्वळ जाहिरातीतून होता. तसेच फेसबुकच्या सर्व सदस्यांना संदे पाठवायचा असेल तर एक डाॅलर प्रती संदेश याप्रमाणे आकारणी केली जात असे. मात्र मार्कला वैयक्तिक संदे पाठवायचा असेल तर, १०० डाॅलर मोजावे लागत.
मार्क हा काळाची पावले ओळखणारा अलौकिक प्रतिभेचा धोरणी उद्योगपती आहे. एप्रिल २०१२ मध्ये मार्कने मोबाईलद्वारा फोटो पाठविण्याचे इन्स्टाग्राम अॅप्लिकेन एक अब्ज डाॅलर खर्चून खरेदी केले. आता इन्स्टाग्रामचे अँड्राईड ॲप्लीकेशन उपलब्ध आहे. मार्च २०१४ मध्ये क्युलस रिफ्ट कंपनीच त्याने खरेदी केली. त्यासाठी त्यांनी ४०० कोटी डाॅलर आणि फेसबुकचे २३.१ कोटी समभाग दिले. तर क्टोबर २०१४ मध्ये वाॅटस्अॅपची खरेदी २२ अब्ज डाॅलरला केली. त्यासोबत १७ कोटीपेक्षा जास्त समभाग दिले.
शा कोटी-कोटीची उड्डाणे घेणाऱ्या फेसबुक आणि मार्कची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली नसती तरच नवल! २०१० मध्ये जगप्रसिद्ध टाईम मासिकाने सर्वात तरूण अब्जाधीश म्हणून त्याचा गौरव केला. त्यावेळी मार्क केवळ २६र्षांचा होता. न्यायालयीन खटले सुरू असतानाही टाईमने हा गौरव केला. डेव्हिड  फिंचर याने तर मार्कच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण केला. सर्वात तरूण अब्जाधीश म्हणून फोर्ब‌्ज मासिकाने मार्कची निवड केली. मार्क हा ४०.३ अब्ज डाॅलरचा मालक म्हणून या यादीत सातव्या क्रमांकावर होता.
१९ मे २०१२ मध्ये अनेक दिवसांपासून प्रेयसी असणाऱ्या प्रिस्टिला चान हिच्याशी विवाह केला आणि आता एक डिसेंबर रोजी तो मॅक्झिमा या कन्येचा ३१ व्या वर्षी पिता झाला आहे. तिच्या जन्मानिमित्त त्याने आपल्याकडील फेसबुकचे ९९ टक्के समभाग दान केले. जगातील मुलांचे चांगले शिक्षण व्हावे. समाजस्तर विकासासाठी सुधारणा करता याव्यात, या उद्देशाने हे दान केले आहे.
सुरूवातीला गमतीने थोबाडपुस्तिका असा फेसबुकचा उल्लेख व्हावयाचा, आज मात्र समाजमन बदलण्यासाठीचे सोल नेटवर्किंगमधील सर्वात प्रभावशाली साधन बनले आहे. ^फेसबुक २००४ पासून सुरू आहे. मी २०११ मध्ये फेसबुकचा वापरकर्ता झालो. सुरूवातीला काढलेले फोटो अपलोड करण्यासाठी फेसबुकचा वापर करायचो. आज मात्र माझे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यावरील प्रतिक्रिया आजमावण्यासाठी फेसबुकचा उपयोग होतो. प्रसिद्ध झालेले लेख, घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, एखादी चळवळ उभारण्यासाठी फेसबुक प्रभावी साधन ठरू कते. कारण फेसबुकची सदस्य संख्या एवढी मोठी आहे की, जगातील तिसरी महासत्ता असे त्याचे वर्णन केले जाते. आपले मत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी उभ्या केलेल्या या यंत्रणेचा सम्राट मात्र आजही तोच आहे, तो म्हणजे मार्क झुकेरबर्ग!

'कनेक्टिव्हीटी हा मानवाधिकार!'
फेसबुक दशकपूर्तीच्या उंबरठ्यावर असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी मार्क झुकेरबर्ग यांनी 'इंटरनेट डॉट ऑर्ग' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी फेसबुकची भावी वाटचाल अधोरेखित करणारी दहा पानी श्वेतपत्रिका प्रकाशित केली. यामध्ये कनेक्टीव्हीटी हा मानवाधिकार असल्याचा उद्घोष त्यांनी केला. त्यानुसार या प्रकल्पामध्ये जगातल्या आघाडीच्या सहा कंपन्यांसमवेत त्यांनी करार केले. यामध्ये सॅमसंग, एरिक्सन, मीडिया-टेक, ऑपेरा सॉफ्टवेअर, क्वालकॉम व नोकिया या कंपन्यांचा समावेश होता. इंटरनेट सेवा कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा व या सेवांचा जगभरात विस्तार करण्याचा हा कार्यक्रम होता. यासाठी फेसबुकने भारतात रिलायन्ससोबत त्याबाबतचा करार केला. तथापि, फेसबुक यामध्ये द्वारपालाची भूमिका बजावेल, आपल्याशी संबंधित कंपन्यांचे जास्तीत जास्त हितरक्षण करण्याचा याअंतर्गत प्रयत्न करेल आणि नेट-न्यूट्रॅलिटीसाठी हा उपक्रम मारक ठरेल, अशी टीका त्यावर झाली. त्यात सकृतदर्शनी तथ्यही आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१५ पासून याअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा फ्री बेसिक्स या नामाभिदानाखाली पुरविल्या जात आहेत.