गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

यंदाचा पाऊस...


(आज बालपणापासूनचा पाऊस आठवत राहीला. मराठवाडा-नाशिक यांचे सहा महिन्यापुर्वीचे पाण्यावरून भांडण आठवले. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थिती तर डोळ्यासमोरच आहे. सारे आठवताना हा पाऊस ज्याची मी दरवर्षी वाट पाहातो. तो अशा वाट लावणाऱ्या रूपात पाहून त्याला विनंती करावी वाटली 'की बाबारे तू आनंदघन बनूनच ये'.. आपल्यासाठी ती प्रसिद्ध केली आहे......)

गावाकडे .. रानात फिरताना...
सवय होती भेगाळलेल्या जमिनी बघायची....
पावसाचे चार थेंबही द्यायचे समाधान..
काळ्या कातळातून येणाऱ्या थेंब थेंब पाण्यानं
कळशी भरल्यावर आनंद व्हायचा...
जग जिंकल्याचा....
बहात्तरचा दुष्काळ... अन्नाचा तुटवडा..
अन पाण्यासाठी वणवण..
सारं स्पष्ट डोळ्यासमोर येतंय...
आज तर पुन्हा पुन्हा दिसतंय...

आजही मराठवाड्याचं चित्र तेच आहे...
नगर सोलापूर भाग म्हणून नाहीत
पण....
हवामानाचा अन पर्यावरणाचा
भाग म्हणून झाकत राजकीय सीमा
मिसळलेत मराठवाड्यात...

पश्चिम महाराष्ट्र संपन्न,
निसर्गाची आहे इथ कृपा..
जोमदार पाऊस अन भरलेली धरण
मराठवाडा मात्र कोरडा..
कप्पाळी कायम दुष्काळ लिहिलेला..
व्याकूळ... तहानलेला...
अनेक वर्षापासून..
दर उन्हाळ्यात
मराठवाडा
आणि
नाशिक भिडायचे...
मराठवाडा पाणी मागणार
अन नाशिक नाही म्हणणार..
दरवर्षीच ठरलेलं ... भांडण...
मराठी मन, मराठी माणस
भांडायची पाण्यावरून...
अस वाटायच...
कधी बुजणार ही दरी
कधी जुळणार ही मने
पण चित्र काही नव्हत बदलत...

यंदा मात्र सारंच बदललं..
पावसानं नको तेवढ ओतलं..
नाशिकला त्याच ओझं झालं..
आपोआप पाणी मराठवाड्यात गेलं...
कोणताही तंटा न होता
जायकवाडी भरू लागलं...

पण हे जाणेही आनंदात नव्हत...
कुसुमाग्रजांच्या 'कणा'ची आठवण
देणार होत...
अनेकांचे संसार होत उद्ध्वस्त..
शेतांची नासाडी करत..
तान्हुल्यांचे रडणे आणि मोठ्यांच्या आक्रोशात..

हे पाणी धावत होत...
जायकवाडीच्या दिशेनं...

कोल्हापूर आणि सांगलीत तर
असा नव्हता कुठलाच नव्हता वाद...
उलट लातूरला पाण्याची रेल्वे
सांगलीनंच होती पाठवली...
पण इथं झालेय सगळेच वेगळे..
शतकानंतर आलाय असा पुर..
बेचिराख झाली हजारो हेक्टरवरची शेती
गावाची झाली बेटं आणि
बेटावर अडकले जीव...
माणसाचे आणि प्राण्यांचेही...
माणसाचा टाहो पोहचत होता..
जनावरं मात्र मुकी होती...
ती बिचारी वाहत गेली
उघड्या डोळ्यानी मरण पहात
मालक मात्र जागेवर होते बसलेले
थिजलेले.. भिजलेले.. अश्रू आणि पावसानं

बालपण आठवलं की ...
येरे येरे पावसा आठवायचं..
चार थेंब पडले तरी मन
मोहरून जायचं...
पावसा, तुझी दरवर्षी वाट पाहतो...
वाट पहावी लागते....
तू आलास की,
तुला मनात साठवतो..
तळ्यात साठवायचा प्रयत्न करतो...
तू नियमीत येत जा...
पण सर्वासाठी आनंदघन बनून ये..
दु:खाचे नकोत रे...
आनंदाचे अश्रू ओघळू देत जा...

पुन्हा नकोस असा येऊ,
विक्राळ रूप घेऊन..
तुझं नवनिर्मितीचं रूपच
तुला दिसते रे शोभून....

९ टिप्पण्या:

  1. वदना आणि आनंद याचा सुदंर मिलाफ.छान

    उत्तर द्याहटवा
  2. महाराष्ट्रातील पाण्याची सद्यपरिस्थितीती, यंदाच्या पावसाचे वास्तवानुभव आणी त्यामूळे लोकांचे विस्कळीत झालेले जनजीवन नेमक्या शब्दात मांडले आहेत सर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सद्य परिस्थितीवर वास्तववादी संवेदना व्यक्त करणारे काव्य... नेमक्या शब्दांत...

      हटवा
  3. खूप छान शब्द रचना डोळ्यात
    पाणि आलं वाचून....राजेंद्र मोरे, नवी मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  4. अशा काही घटना असतात त्या शब्दात व्यक्त करणे कठीण पण तू कमी शब्दात खूप मोठा गर्भितार्थ सांगतोस अण्णा

    उत्तर द्याहटवा