सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

२०१८… गुड बाय… वेलकम २०१९


(होऊ दे… तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा…
अन.. भारतीयत्व हा धर्म….
बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान…
आपोआप होईल भारत देश महान…
नववर्षाच्या सर्वाना शुभेच्छा….
... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
दोन देशएक भारत... दुसरा अमेरिका
दोन वैज्ञानिक... एक भारतात... दुसरा अमेरिकेत
दोघांचे विषय वेगळेपूर्णत: परस्परभिन्न
एक भौतिकशास्त्राचा अभ्यास
तर दुसरा….
शांत मनासाठी... भरले पोट ठेवण्यासाठी….
नवे वाण शोधणारा...


एक विकलांग... स्वतःचा हातही हलवू न शकणारा...
दुसरा धडधाकटरोज शेताला फेरी मारणारा...
एकाला विश्वाचा वे घ्यायची आस
दुसऱ्याला मातीतून सोनं पिकवायचा ध्यास...
एकाला विद्यापीठांनी घेतलं डोक्यावर...
इतकं की, पाय टेकू नयेत जमिनीवर
टेकणार तरी कसे?पायात तेवढा नव्हता जीवच...
तर दुसरा... ज्याला फसवलं विद्यापीठानेच...
त्याचं संशोधनछातीठोकपणे लुटलं...
खपवलं... स्वतःच्याच नावावर...

दोन विसंगत माणसंदोन देशांतील
दोन समाजातीलदोन भिन्न विषयांतील..
तरीही अनेक साम्यस्थळं...
मनात खोल.... घर करून बसलेली

पहिला अमेरिकेत
त्याचा केला नियतीने घात
धडधाकट शरीरझालं लुळंपांगळं...
चालणं तर सोडा... बोलणंही बनलं ठी..
तरीही तो उभा राहिलाकेवळ डोक्यानं...
जग आलं मदतीलासावरायला त्याला
उभं केलं मनानं.. अवकाशात झेपावायला...

त्याच्या मर्यादाच... बनल्या त्याचं बलस्थान...
शरीराने नव्हेतो फिरला मनानं
संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात...
शोध घेत विश्वाचा... त्याच्या निर्मितीचा...
म्हणे काळ इतिहास घडवतो
तो साक्षीदार असतोइतिहासाचा
याने तर सांगितला….
काळाचा संक्षिप्त इतिहास ….
जगाला पटलं... याला घेतलं डोक्यावर
दर्शनासाठी लागल्या रांगा
भाषणं ऐकायला.. तुफान गर्दी

तो बोलायचा... दाबत कळा संगणकाच्या….
व्हायचा व्यक्तजगाचे भविष्य सांगतजगाच्या इतिहासासह..
कारण त्याला समजला होताकाळाचाच तिहास..
तो जगला मस्त जगला... उपभोगत सारे ऐश्वर्य..
नव्या संशोधकाना शिकवतघडवत राहिला आयुष्यभर
वर्तमानाशी लढा देतनियतीवर मात करत
सारे होते त्याच्या दिमतीला
प्रत्येक इच्छेची पुर्ती करायला
म्हणूनच तो अमेरिकेचा नव्हे, ठरला जगाचा मानबिंदू
स्टीफन हॉकींग…. खरंच एक दंतकथा बनला

दुसरा भारतात
जन्मला खेड्यातवाढला खेड्यात
शाळेशी गट्टी नाही जमली...
तिसरीनंतर कायमची बुट्टी...
शिकण्यापेक्षावडिलांंना शेतात मदत करणं होतं गरजेचं...
जगायचं तर... पोटाचा प्रश्न सोडवणं होतं आवश्यक

पाहिलेलं.. दिसलेलं... करायचा व्यक्त इतरांजवळ
पण ऐकायचं कोण?
त्याला थेट नाकारलंच
अतिशहाणा.. डोकेवाला
असंच त्याचं बारसं केलं...

तो होता धडधाकटचालायचा.. फिरायचा...
वडिलांकडून घेतलेशेतीचे धडे
बी निवडायचे अन् पेरायचेही
पुढे स्वत: शिकला… 
बनवायला नवे वाण
एकलव्यासारखा
मात्र याचा अंगठा... समाजानंच घेतला ओरबडून

स्वतःच्या वाणाचं नाव ठेवायचं भाग्यही
नव्हतं त्याच्या नशीबी
पहिलं तर अपघातानंच ठेवलं 'एचएमटी'
पुढचं आम्ही बदलून टाकलं
म्हणत कधी 'ओमशांती' तर कधी 'जय श्रीराम'
तरीही तो चालत राहिला...
न थकता... न थांबता...
नवे वाणशोधत राहिला
चवीचा भात ज्यानं दिला आम्हा...
तो बाप कधीच नाही कळला..

माहिती झालं सारं... पण तो गेल्यावर
गेलाही विपन्नावस्थेत
उपचाराला नव्हते पैसे...
म्हणून घरातचमोजल्या शेवटच्या घटका
ना कोणी विद्यार्थीना कोणी प्रेक्षक
कधी काळी... कुणी तरी... दिलेले पुरस्कार
पावसात भिजतील अशा घरात
त्याच्या मृत्यूचे... तेच तेवढे मूक साक्षीदार...

गेलाएक डोकेवाला संशोधक
शिकताहीअभिजात संशोधन करणारा
दादाजी रामजी खोब्रागडेधरतीचा सुपुत्र खरा..

२०१८तू दोघांनाही सोबत घेऊन गेलास..
एक माझ्या विषयातला
दुसरा जिव्हाळ्याच्या क्षेत्रातला...
तू असा वागलास तरी...
रितीप्रमाणेतुला गुड बाय म्हणावे लागणार
आणि...
नाही म्हणालोतरी तू थोडा आहेस थांबणार
जा तूतुझ्या मार्गानं... शांती तेवढी प्रदान कर... या दोघांच्याही आत्म्याला...

२०१९... वेलकम... तुझंही स्वागतच असो...
तू येसर्वांसाठी सुखशांती घेऊन ये
सर्व सुखात राहू देतचांगलं लाभू दे आरोग्य..
आमच्या मनाचं आरोग्यही ठेव चांगलं
सुवातीलाच विनंतीतू नको वागूगत सालासारखा..
कोणा हॉकिंगला नको करूस लुळपांगळं..
अन्
कोणा दादाजीचीअशी होऊ देऊ नको अवहेलना...
जागे ठेव आमचे मनआणि संवेदना
होऊ देतिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा...
भारतीयत्व हा धर्म....
बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान
आपोआप होईल भारत देश महान

नववर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!



१७ टिप्पण्या:

  1. राममनोहर लोहियांचे एक वाक्य कायम सांगायचे "लोक मेरी बात मानेंगे जरूर ..... लेकीन मेरे जाने के बाद". त्याच प्रमाणे दादासो आम्हाला समजले त्यांच्या जाण्यानंतरच.

    उत्तर द्याहटवा
  2. सर, आपण भावनांना विचारांची अन् विचारांना भावनांची साथ देऊन या लेखातून परत एकदा २०१८ मध्येच नव्हे तर आपला इतिहासच वळून पहावयास लावले व नविन वर्षांचा संकल्प करण्यासाठी तत्पर केले. खुप छान माहिती!!

    उत्तर द्याहटवा
  3. दोन अवलियांची गाथा...काहिंशी व्यथा...वेदनादायी तरीही प्रेरणादायी..सर,आपल्या सादास नक्कीच प्रतिसाद देईल..२०१९!

    उत्तर द्याहटवा
  4. हाॕकिंग्ज यांच्याबद्दल समजू शकतो. पण खोब्रागडेंच्या बाबत जे घडले त्याने मन विषण्ण झाले.अपराधीपणा जाणवला..

    उत्तर द्याहटवा
  5. सर, आपण लेखातून खूपच चांगली माहिती दिली.धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  6. जीवन प्रेरणा देणारे शिक्षक असतात.वास्तव काय आहे हे सांगून आदर्शाची जपणूक ते करतात.मानवी मनाची जडणघडण आपण करता आहात. हे काम अमूल्य आहे.जीवनाला रंग आणणाऱ्या संशोधकांना प्रकाशात आणून आपण समाजजीवन उजळ करताहात. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच सुंदर.सरत्या वर्षांचा निरोप घेताना त्यालाही चांगला संदेश दिलाखूप आवडला लेख .

    उत्तर द्याहटवा
  8. नमस्कार सर,

    खूपच छान उपक्रम आहे हा

    अनेक शुभेच्छा

    राजेंद्र मोरे मुंबई

    उत्तर द्याहटवा
  9. सर नमस्कार
    सर लेख फार चांगला झाला आहे. या लेखातून वाचकांना एक प्रेरणा मिळते. अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  10. सर नमस्कार
    सर लेख फार चांगला झाला आहे. या लेखातून वाचकांना एक प्रेरणा मिळते. अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  11. सर नमस्कार
    सर लेख फार चांगला झाला आहे. या लेखातून वाचकांना एक प्रेरणा मिळते. अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  12. मन पिळवटून टाकणारं भाष्य..
    संवेदना जागृत राहिली तरच संविधान भारतधर्म होईल...

    उत्तर द्याहटवा
  13. परस्पर विरोधाभास व साम्य एका समान कारणासाठी, अतिशय सुंदर लेखन. नवीन वर्षात असेच दर्जेदार लेखन आम्हा सर्वास आपल्याकडून मिळावे हीच विनंती

    उत्तर द्याहटवा