(नोव्हेंबर २०१९ पासून जागतीक पातळीवरील भौतिकशास्त्रातील 'इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल
फिजिक्स' या इटलीतील नामवंत संस्थेचे संचालक म्हणून मराठमोळ्या डॉ. अतिश दाभोळकर
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भौतिकशास्त्र विषयातील नामवंत संशोधक व्यक्तीमत्त्व
या पदावर विराजमान होत असल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला असायला हवा. त्यांचा अल्प
परिचय या लेखात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमत कोल्हापूरच्या 'विज्ञान' या
सदरात शुक्रवार नांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी येथे पुनर्प्रकाशित
करत आहे.….. व्ही.एन.
शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------------

अशा जागतिक संशोधनात समन्वय साधणाऱ्या
संस्थेच्या संचालक पदी अतिश दाभोळकर यांची निवड झाली आहे. दाभोळकर हे नाव महाराष्ट्राला
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यामुळे सुपरिचित आहे. नरेंद्र दाभोळकरांचे अतिश हे
पुतणे. अतिश हे स्वत: अंधश्रद्धा निर्मुलन मोहिमेचे खंदे पुरस्कर्ते आहेत.
जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा म्हणून त्यांनी 'ॲक्टनाऊ' नावाचे संकेतस्थळ
सुरू करून ही मोहिम राबवली होती. अनेक संशोधकांचा या विधेयकाला पाठिंबा मिळवून
त्यांनी शासनावर दबाव आणला होता. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. त्यांचे
मूळ गाव हे जरी सातारा असले तरी अतिश यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी
येथे गेले आहे.

त्यांनी सैद्धांतीक भौतिकीमध्ये आपले संशोधन
केले आहे. यामध्ये स्ट्रींग थिअरी, कृष्ण विवर आणि पुंज गुरूत्व या विषयावर
उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांना २००६ साली शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले. भारतीय विज्ञानातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च
सन्मान आहे. भारताच्या राष्ट्रपतींचा विज्ञानातील सर्वोत्कृष्ट नेतृत्वासाठीचा
पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. फ्रांसमधील सर्वोच्च गुणवत्तेचे
संशोधन केल्याबद्दलचा पुरस्कार त्यांना देण्यात
आला आहे. भारतीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या संशोधनाचा
दर्जा हा अत्यंत उच्च राहिला आहे. २००१ मध्ये अतिश यांनी स्ट्रींग थिअरीवर
प्रसिद्ध केलेल्या संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रातील दंतकथा बनलेले महान संशोधक
स्टीफन हॉकिंग हे व्हील चेअरवर बसून त्यांना भेटायला गेले होते. यातच त्यांच्या
कार्याचे मोठेपण लक्षात येते. विज्ञानावर सार्वजनिक कार्यक्रमात षण्मुखानंद
हॉलमध्ये त्यांनी जाहिर व्याख्यान दिले. अशा या मराठमोळ्या, या मातीतील माणसाला या
जागतिक संशोधन संस्थेची संचालक पदाची जबाबदारी पाच वर्षाकरिता मिळाली आहे.
त्यांच्या निवडीने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे!